Ad will apear here
Next
शिवराज्याभिषेकानिमित्त रायगडावर ‘शटल सर्व्हिस’
कोल्हापूर : यावर्षी पाचाड ते रायगड, अशी शटल सर्व्हिस सुरू करण्यात आल्याने शिवराज्याभिषेकास हजेरी लावण्याऱ्यांची अडचण दूर झाली आहे. महाड ते रायगड या मार्गात होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे शिवभक्तांना दरवर्षी अडचणींचा सामना करावा लागतो. सहा जून रोजी शिवराज्याभिषेक असून, त्यानिमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पाचाड परिसरात केली असून तेथून मिनी बसने शिवभक्तांना रायगडच्या पायथ्यापर्यंत सोडले जाणार आहे.

रायगडवाडी, निजामपूर, पाचाड परिसरात वाहने पार्क करण्यासाठी जागा आहे. पाचाड ते रायगडचा पायथा हे अंतर दोन किलोमीटर इतके आहे. समितीने पाचाडमधून शिवभक्तांना शटल सर्व्हिसद्वारे पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. भक्त रोप-वेद्वारे दिवसभरात गडावर जाऊ शकतात. त्यामुळे शिवभक्तांनी गड पायथ्याखालून चालत गडावर जावे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रोप-वेचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणाऱ्या शिवभक्तांच्या गर्दीचा आकडा पाहता समितीने कंबर कसली आहे. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या नेतृत्वाखाली ४२ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीची जबाबदारी निश्चित केली आहे. देशभरातील शिवभक्तांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. त्यातील एक अडचण म्हणजे ट्रॅफिक जॅमची. दरवर्षी शिवभक्तांची रायगडावर गर्दी होत आहे. दुचाकी, चारचाकी, लक्झरी, एस.टी.ने शिवभक्त गडाच्या पायथ्याला येत आहेत. त्यामुळे महाड ते रायगड मार्गावर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत आहे. काही शिवभक्तांना पाचाडमध्ये येऊनसुद्धा सोहळ्याला हजेरी लावता येत नाही.

होळीच्या माळावर असेल नियंत्रण कक्ष...
गडावरील होळीच्या माळावर समितीतर्फे नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. गडावर वैद्यकीय सेवाही उपलब्ध केली असून, डॉक्टर्सही गडावर मुक्कामाला असतील. शिवभक्त, महिला, युवती यांना काही अडचण असल्यास त्यांनी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZYXGBC
Similar Posts
शिवराज्याभिषेकासाठी ‘मावळे’ रवाना कोल्हापूर : रायगडावर पाच व सहा जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अन्नछत्रासह पूर्वनियोजनासाठीची टीम शुक्रवारी रवाना झाली. जुना राजवाडा येथील नगारखाना येथून संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन समितीच्या टीमला शुभेच्छा देण्यात आल्या
‘रत्नागिरी जिल्ह्यातील जेटींच्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा’ मुंबई : ‘दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील विविध जेटींची आणि रस्त्यांची कामे, तसेच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करा,’ अशा सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्या आहेत.
शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी कोल्हापूर : रायगड किल्ल्यावर सहा जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नाही, तर देशभरातून लाखो शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पाच व सहा जूनला रायगडावर उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language